नित नवे आसमंत
प्रत्येक वेळी दिसे मज
नित नवे हे आसमंत
कधी ढगांच्या दुलईत
तारे लपून जाती
कधी शुभ्र तेजस्वी चंद्र
भोवती खळे वलयांकित
तारे करती टीमटीम
कधी नभ रेखाटती नक्षी
कधी निरभ्र स्वछ आकाश
स्वछ मनाचा जसा आरसा
कधी काळ्या ढगांना
सोनेरी किनार सुरेख
किरणप्रभा रवीची
घेई मनाचा ठाव
आज सकाळी मन हर्षिले
निळ्या पटावर गगन नभाळले
कधी सांजवेळी नभ धरा उतरू पाहे
पाहुनी तो रंगोत्सव
मज जीव हा ओवाळावा वाटे
वाटे हे आकाश कवेत घ्यावे!

Comments
Post a Comment